||कभी गहरे समंदर कि गहराईया, कभी उंचे पहाडो कि उंचाईया,तू ही अम्बुआकि छायामे खोया मितवा||
सह्याद्री म्हटल की डोळ्यासमोर उभा राहतो तो कातळ कद्यामधील थरार,लांबलचक दऱ्याखोऱ्या,उंच उंच डोंगररांगा आणि त्या डोंगरावरून डोळ्याचं पारण फेडणारा निसर्ग हे सारे अनुभव जर अनुभवायचे असतील तर आयुष्यात नक्कीचं सह्याद्रीची भटकंती केली पाहिजे.उंच अश्या कड्यावर सह्याद्री अनुभवायचं सुखचं काही वेगळं आहे.उंच सह्याद्रीच्या कड्यावरून नजर फिरवल्यावर ऊन धुक्याशी लपाछुपी खेळताना दिसते. वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळूकेने लवचिक गवताची लादी हेलकावे घेऊन नृत्य करताना दिसते. गवताच्या भालदार पात्या जोरात आदळणाऱ्या पावसाच्या थेंबांना सहज अंगावर झेलून तठस्थ उभे राहतात. तश्याच सह्याद्री पर्वत रांगा आजही तटस्थ उभ्या आहेत.सह्याद्रीतील एक एक गड राजाच्या इतिहास सांगतो. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात गुंजलेले तोफांचे आवाज तिथल्या माती दगडात मुरून आजही जिवंत आहे. सह्याद्री हा असा आहे की उन्हाळा येवो किवा पावसाळा तो ताठ मानेने उभा असतो. उन्हाळ्यात त्याचावर वाळ लेले गवत जणू पिवळे सोनेच! पावसाळ्यात त्याचे सौंदर्य जणू खुलतेच आणि एखाद्या नवीन नवरीने जसा नवाकोरा हिरवा रंगाचा शालू परिधान करावा तशा प्रकारे सह्याद्रीचे सौदर्य दिसून येते. त्याच्या अंगाखांद्यावर जणू पाढरा शुभ्र शेला घेतल्या सारखा पाण्याचा झरा वाहत असतो. खरचं सह्याद्रीशी खूप घट्ट अस एखाद्या चुंबका सारखं नात तयार झालं आहे जे आयुष्यात कधीच तुटणार नाही आणि एकमेकांपासून लांब ही होणार नाही.खरचं सह्याद्रीत छोट्या छोट्या गोष्टींचं सुखं शोधायचं व्यासान लागलं की शहरातील मोठी मोठी दुःख सहज पचवता येतात.

_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
#maharshtra #maharashtra_desha #sahyadri #treakker #traveler #maharashtra #maharashtraforts 🚩 # Pune #punediaries #tikonafort #treakker_Life #adventurer #viewfinder #nature #naturelover #treakker_Life #mumbaikar #maharashtrakille #kille
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
Photography :- @jiddimaratha
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

Tikona Fort

89

2

  • @ankita_sakpal_26 13 June, 2019

    Rada na raooooo🔥😍❤️